आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांच्या हस्ते‎ रुग्णालयाचे स्थलांतर‎:कौशल्या नर्सिंग होमचा नव्या वास्तूत शुभारंभ‎

चिखली‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील डॉ. विठ्ठल काळुसे यांनी‎ जाफ्राबाद मार्गावर उभारलेल्या‎ कौशल्या नर्सिंग होमचे उद‌्घाटन‎ रामनवमीच्या पर्वावर दि. ३० मार्च रोजी‎ करण्यात आले. डॉ. काळुसे यांच्या‎ आई कौशल्या आणि वडील श्रीराम‎ यांच्या हस्ते फित कापून रुग्णालयाचा‎ स्थलांतर व प्रवेश सोहळा पार पडला.‎ याप्रसंगी आ. श्वेता महाले,‎ सिद्धेश्वर काळुसे, जयश्री काळुसे, डॉ.‎ विठ्ठल काळुसे, डॉ. अनुपमा काळुसे‎ यांची उपस्थिती होती.‎ डॉ. विठ्ठल काळुसे यांनी चिखली‎ येथे रुग्णालय सुरू केले.

सहा वर्षे‎ यशस्वी सेवा दिल्यानंतर रुग्णांची‎ संख्या वाढल्याने रुग्णालयाच्या जुन्या‎ वास्तूची जागा अपुरी पडू लागली.‎ त्यामुळे चिखली-जालना‎ महामार्गालगत असलेल्या जाफ्राबाद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मार्गावर त्यांनी कौशल्या नर्सिंग होमची‎ उभारणी केली. याप्रसंगी माजी‎ आमदार राहुल बोंद्रे, कुणाल बोंद्रे,‎ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत‎ भुसारी, डॉ. प्रतापसिंह राजपूत, डॉ.‎ प्रतापसिंह परिहार, पंडितराव देशमुख,‎ कुष्णकुमार सपकाळ, डॉ. प्रकाश‎ शिंगणे, डॉ. कमळस्कर, डॉ. रामेश्वर‎ दळवी, डॉ. तायडे यांच्यासह विविध‎ क्षेत्रातील भेट देऊन डॉ. विठ्ठल काळुसे‎ यांना शुभेच्छा दिल्या.‎

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा :‎ डॉ. विठ्ठल काळुसे‎ आयुष्यात चांगला डॉक्टर होऊन‎ गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा देऊन‎ अविरतपणे काम करणार असल्याचे‎ याप्रसंगी डॉ. विठ्ठल काळुसे यांनी‎ सांगितले. रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा‎ असल्याचेही ते म्हणाले.‎