आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा सप्ताहाचे उद‌्घाटन:राजश्री ग्लोबल स्कूलमध्ये‎ क्रीडा सप्ताहाचे उद‌्घाटन‎

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर‎ स्थानिक राजश्री ग्लोबल स्कूलमध्ये‎ सोमवारी, दि. २ जानेवारी रोजी क्रीडा‎ सप्ताहाचे उद‌्घाटन तालुका क्रीडा संयोजक‎ जी. एल. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री‎ ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या सरिता खंडेलवाल‎ होत्या. पंजाबराव जाधव कला व विज्ञान‎ कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य पी. टी. बोरकर,‎ सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. गजानन‎ निकस, सिंधुताई जाधव कला व विज्ञान‎ महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका डॉ. संगीता‎ खडसे, ग्लोबल स्कूलचे उपप्राचार्य प्रवीण‎ गावंडे, प्रशासक मनोहर म्हळसने यांची प्रमुख‎ उपस्थिती होती.

सुरुवातीला सरस्वती पूजन व‎ मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात‎ आले. त्यानंतर क्रीडा सप्ताहाच्या प्रत्येक‎ गटातील विद्यार्थ्यांचे संचलन झाले.‎ क्रीडा संयोजक राठोड यांनी यावेळी‎ बोलताना खेळ हा जीवनाचा सर्वोत्तम भाग‎ असल्याचे सांिगतले. कार्यक्रमाच्या शेवटी‎ आठवीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा नृत्य सादर‎ केले. क्रीडा सप्ताहासाठी संस्थेचे संस्थापक‎ अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव, कार्यकारी‎ अधिकारी गणपतराव रहाटे, संस्थेचे सचिव‎ ऋषी जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव‎ यांनी केले. विश्वास काळे यांनी आभार‎ मानले. कार्यक्रमासाठी क्रीडा उपप्रमुख रवी‎ लोखंडे, विद्या मुळे, शुभांगी साठे यांच्यासह‎ सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...