आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जिगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रापासून वंचित असलेली गावे समाविष्ट करा; आमदार राजेश एकडे यांची मंत्री जयंत पाटीलांकडे मागणी

मलकापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रापासून वंचित असलेली नांदुरा तालुक्यातील १४ गावे लाभ क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी आमदार राजेश एकडे यांनी जलसंधारण मंत्री जयंत पाटील, यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ५ मे रोजी केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार जिगाव प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर, यांच्या अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव गावाजवळ पूर्णा नदीवर प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामध्ये १५ उपसा सिंचन योजना असून त्याद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर आणी नांदुरा या ६ तालुक्यातील २६८ गावातील व अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हारा या दोन तालुक्यातील १९ गावातील एकूण ७८,५८० हे क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे. परंतु नांदुरा तालुक्यामध्ये हा प्रकल्प असून देखील या तालुक्यातील १४ गावे ही लाभ क्षेत्रा पासून वंचित आहेत. या गावांना लाभ क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी आमदार एकडे यांनी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...