आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:एसटी, मिनी बससह इतर वाहनांचाही समावेश; 240 वाहनांद्वारे कर्मचाऱ्यांची पथके रवाना

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी, दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, आज, दि. १७ एकूण २४० वाहनांद्वारे निवडणूक कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांकडे मार्गस्थ झाले.

जिल्ह्यात २५९ ग्रामपंचायतींसाठी एकूण ८४२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, आज सर्व १३ तालुक्यांमधून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पथकांना नियोजित स्थळी रवाना करण्यात आले.

निवडणूक विभागाने यासाठी जिल्हाभरात एकूण २४० वाहनांची व्यवस्था केली. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बस, शाळांच्या मिनी बस तसेच इतर वाहनांचा समावेश आहे. बुलडाणा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून, तहसील कार्यालयातून दुपारी १४ मिनी बस आणि ७ जीपद्वारे निवडणूक कर्मचाऱ्यांची पथके संबंधित गावांकडे मार्गस्थ झाली. विविध मार्गांवरील गावांसाठी वाहनांचे नियोजन करून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यासह रवाना करण्यात आले.

तहसील कार्यालयांत वर्दळ
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची पथके मार्गस्थ होणार असल्याने आज सकाळपासून सर्वच तहसील कार्यालयांमध्ये वर्दळ होती. तहसील कार्यालयाबाहेर पथकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या

बातम्या आणखी आहेत...