आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना साद देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी इमारत बांधकाम, ११५ वर्ष जुन्या खामगाव-जालना रेल्वे मार्गाला राज्य शासनाचा हिस्सा देण्याची घोषणा केली असून संत्रा प्रक्रियेसाठी मात्र तरतूद केली आहे. वैनगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्पाचेही पाणीही वळवणार असल्याने तो सुध्दा मागणीतीलच एक विषय होता. सिंदखेड राजा ते शेगाव चौपदरीकरणासाठीही अर्थसंकल्पात समावेश होता. मात्र सिंदखेड राजा विकास आराखड्याबाबत व लोणारच्या पर्यटनाबाबत काही घोषणा झाली नाही. याकडे दुर्लक्ष मात्र करण्यात आल्याचे दिसत आहे. टेक्स्टाइल पार्कची घोषणाही भाजप सरकारनेच केली होती. त्याचे काय झाले हे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहित आहे. खामगाव- जालना या रेल्वे मार्गाचे ब्रिटिश काळात काम सुरु झाले होते. परंतु दुसरे महायुद्ध सुरु झाले विदर्भ-मराठवाडा या मागास भागाला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाचे काम रखडले. तेव्हापासून या रेल्वे मार्गाचे काम व्हावे यासाठी प्रयत्न झाले होते. रेल्वे लोक आंदोलन समितीने आंदोलनेही केली हेाती.
केवळ १६५ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. केंद्र सरकारने तरतूदही केली होती. अखेर वर्षभरापूर्वी पुर्नसर्वेक्षण या रेल्वे मार्गाचे करण्यात आले होते. रेल्वेचा मार्ग हा राज्याच्या पन्नास टक्के निधी शिवाय होणार नाही. असे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी व आताचे भाजप शिंदे सरकार यांच्याकडे सातत्याने येथील प्रतिनिधींनीही पाठपुरावा केला आहे. त्यामुळे कदाचित यावेळी आपला हिस्सा देण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला किती काळ लागेल मात्र हे अजून स्पष्ट झाले नाही. जिल्ह्याला काय मिळाले अन् काय राहिले बुलडाणा जिल्ह्याचे ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे. ही मागणी खरे तर दहा वर्षांपूर्वीची आहे. तेव्हापासून बुलडाणेकरांना हे महाविद्यालय आज होईल उद्या होईल असे वाटले होते. अखेर ते मंजूरही झाले आहे. या महाविद्यालयासाठीची जागेची पाहणी व इतर बाबींची पाहणी सुध्दा समितीने केली होती. जिल्हा सामान्य रुग्णालय ही इमारतही त्या दृष्टीने योग्य होती. जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची नवीन इमारतही तेव्हा उभी होती. क्षय आरोग्यधाम ही रिकामे झाले होते. सर्व सुविधा उपलब्ध असताना इमारत बांधकामासाठीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने आता वैद्यकीय महाविद्यालय या सत्रापासून सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. बुलडाणेकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारा प्रकल्प जिल्ह्यात व्हावा. अशी मागणी बऱ्याच दिवसांपासूनची आहे. जिल्ह्यात फळ व भाजीपाल्यासाठी कोल्ड स्टोअरेज असावे, अशीही मागणी आहे. मात्र कोल्ड स्टोअरेज बाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र संत्रा पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या या उद्योगाची घोषणा झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २२०० हेक्टर क्षेत्र हे संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात संत्रा फळपिकांसाठी आहे. या भागाला या संत्रा प्रक्रिया उद्योगाचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातून शेगाव-बैतुल हा मार्ग गेल्याने शेगाव-अजिंठा या दोन स्थान जोडले गेले आहे. आता सिंदखेड राजा-शेगाव मार्ग चौपदरीकरण होणार असल्याने पर्यटन व र्तिर्थाटनला प्रगती मिळेल व रोजगारातही वाढ होईल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पैनगंगा-वैनगंगा-नळगं गा नदी जोड प्रकल्पाचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाले असून सदर योजनेअंतर्गत असलेल्या खामगाव ते पेन टाकळी या जवळपास ४७ किमी चे सर्वेक्षण अद्यापही बाकी आहे. हे सर्वेक्षण केवळ निधीमुळे रखडलेले आहे. या अर्थसंकल्पात पैनगंगा-वैनगंगा नदी जोड प्रकल्पालाही स्थान देण्यात आले आहे.
असा राहू शकतो खामगाव-जालना रेल्वे मार्ग
मध्य रेल्वे विभागाकडून नवीन खामगाव-जालना रेल्वे मार्ग रोड ब्रॉडगेज लाइन १६२ किमी प्रस्तावित असून हा मार्ग बुलडाणा व जालना जिल्ह्यातून जात आहे. या रेल्वे मार्गावर १७ स्टेशन प्रस्तावित आहेत. या रेल्वे मार्गासाठी खासगी ५८१.६० हेक्टर आर जमीन व वनजमीन ४८.५८ हेक्टर आर लागणार आहे. या मार्गावर मोठे ३७ व लहान १३८ पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहेत. सदर मार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण मार्च २०२२ मध्ये झाले असून तसा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालय मध्ये सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी ४५३८ कोटी इतका खर्च लागणार असून प्रति किमी साठी २८.१ कोटी इतका खर्च येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.