आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खामगाव आगाराला 13 बसेसमधून लाखोंचे उत्पन्न, चार महिन्यानंतर 44 कर्मचारी झाले कामावर रुजू ; नागरिकांना दिलासा

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आगारातील संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी दहा कर्मचारी तब्बल चार महिन्यानंतर ३१ मार्च रोजी कामावर रुजू झाले आहेत. यापूर्वी सुद्धा काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामध्ये १३ वाहक, १८ चालक, २ क्लर्क, २० मॅकेनिकल, व एक स्वच्छता सेवक अशा ४४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे खामगाव आगारातील तेरा बसेसची चाके रस्त्यावर धावू लागली आहेत.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्याच्या सातही आगारातील हजारो कर्मचाऱ्यांनी संपात उडी घेतली होती. मागील ७ नोव्हेंबर पासून खामगाव आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे या आगारातील बसेसची चाके एकाच जागीच थांबली होती. बसेस नसल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती.परंतु उशिरा का होईना मागील महिन्याभरापासून या आगारातील काही बसेस रस्त्यावर धावु लागल्या आहेत. सध्या स्थितीत या आगारातील तेरा बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामध्ये शिर्डी, सप्तशृंगी गड, औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, शेगाव, यासह इतर बसेसचा समावेश आहे.

यातून आगाराला एक लाखाच्या जवळपास उत्पन्न मिळत असल्याची माहिती आगार प्रमुख आर.यु. पवार यांनी दिली आहे. आतापर्यंत खामगाव आगारातील ४४ कर्मचारी कामावर रुजू झाले असून उर्वरीत कर्मचारी कधी रुजू होतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. खामगाव आगारात १०६ चालक, ८९ वाहक, ४० मेकॅनिक व अन्य कर्मचारी २७ असे एकुण २६२ कर्मचाऱ्यांची संख्या आहे. आगारातील संपूर्ण कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर आगारात उभ्या असलेल्या बसेस रस्त्यावर धावणार आहेत. त्यातून आगाराच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...