आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहदरी- तोरणवाडा‎ रस्त्याचे काम संथगतीने‎:वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय‎

उदयनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील मोहदरी ते तोरणवाडा या‎ रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक‎ योजनेंतर्गत मागील दीड वर्षांपासून‎ संथगतीने सुरू आहे. त्यामुळे‎ वाहनधारक आणि नागरिकांची‎ गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्त्याचे‎ काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी‎ परिसरातील नागरिकांकडून केली‎ जात आहे.‎ प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत‎ मोहदरी ते तोरणवाडा रस्त्याच्या‎ डांबरीकरणाच्या कामाला दीड‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली‎ होती. संबंधित कंत्राटदार कंपनीकडून‎ मुरूम आणि गिट्टी टाकून काम‎ संथगतीने केले जात आहे. त्यामुळे‎ वाहनधारकांना रस्त्यावरून जाताना‎ कसरत करावी लागत आहे.‎