आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्ल्यू:स्वाइन फ्ल्यू, स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ; 13 वर उपचार सुरू

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात स्वाइन व स्क्रब टायफस या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्वाइन फ्लूच्या व स्क्रब टायफसचा प्रत्येकी एका रुग्णांची आज जिल्ह्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यासाठी ऐन सणासुदीच्या दिवसात कोरोना आटोक्यात असताना झालेल्या या आजारामुळे जनतेत मात्र आता भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. स्क्रब टायफसचे आजपर्यंत दहा रुग्ण झाले असून स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण झाले आहे.

स्वाइन फ्लू व स्क्रब टायफस ही वेगवेगळी आजाराची नाव असली तरी बहुतांशी लक्षणे सारखी असून स्वाइन फ्लू या आजारामुळे बुलडाण्यातील एका रुग्णाचे निधन झाले होते. त्यामुळे बुलडाणा शहर हादरलेले असतानाच पुन्हा एक स्वाइन फ्लू रुग्ण लोणारचा आढळला जो अकोला येथे उपचार घेत होता. ते होत नाहीतर आज पुन्हा एक स्वाइन फ्लूचा रुग्ण बुलडाणा शहरातीलच काँग्रेस नगर भागातील एक महिला रुग्ण आढळल्याने बुलडाणेकर धास्तावले आहेत. यापूर्वी बुलडाणा शहरातीलच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर स्वाइन फ्ल्यूचेही असेच होत असल्यामुळे बुलडाणेकर धास्तावणे साहजिकच आहे. मात्र स्क्रब टायफसचा रुग्ण बुलडाण्यात आढळला नाही. मात्र तो खामगाव परिसरात आढळत असल्याने त्या परिसरातील लोकांमध्येही भीती पसरली आहे. गवतामध्ये गेल्यास हा आजार होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आज जो रुग्ण आढळला तो मेहकर परिसरातील आहे. या आजारांमुळे मात्र आरोग्याचे संकट पुन्हा एकदा जिल्ह्यावर घोंघावते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

संसर्ग पसरण्याआधी सर्वेक्षण महत्वाचे
कोरोना हा सुद्धा साथरोग होता. त्यावेळी आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाने बरीच मेहनत घेतली. आताही बुलडाणा शहर व लगतच्या काँग्रेस नगर भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. सध्या स्वाइन फ्लूची तपासणी बुलडाणा येथीलच कोरोना प्रयोगशाळेत केली जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील तपासण्या करुन घेणे आवश्यक आहे. त्याचे सर्वेक्षणही संबधित ग्रामपंचायत व नगर पालिकेनेही करणे आता गरजेचे आहे. आजार हाताबाहेर जाणार नाही. याची वेळीच काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेणेही आवश्यक आहे.

आज स्क्रब टायफसचा रुग्ण आढळला
जिल्ह्यात स्क्रब टायफस या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापुर्वी नऊ रुग्ण आढळून आले होते. या आजारापासून बचावासाठी गवतात जाताना गम बूट घालणे आवश्यक आहे. या आजारावर निदान आहे तर तपासणीही प्रत्येक ठिकाणी होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे दहा रुग्ण झाले आहेत.
-डॉ. प्रशांत तांगडे पाटील, साथरोग अधिकारी, जि.प. बुलडाणा

रुग्णांवर बुलडाण्यातच उपचार सुरू
स्वाइन फ्लू आजाराचा दुसरा रुग्ण बुलडाण्यात आढळला आहे. आज आढळलेला रुग्ण हा दुसरा रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा शहरातील या रुग्णाची प्रकृती सध्या ठीक आहे. बुलडाण्यातच या आजारावर उपाय होत असल्याने शहरातील किंवा जिल्ह्यातील रुग्ण बाहेर उपचार घेत असतील तर त्याची माहिती बुलडाण्याला नाही. मात्र आपल्याकडे योग्य असे उपचार केले जात आहेत. -डॉ. सचिन वासेकर, वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...