आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीं:पेट्रोल पंप लुटणाऱ्या आरोपींच्या कोठडीत वाढ

साखरखेर्डा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर रात्री दरोडा टाकणाऱ्या चार दरोडेखोरांना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.२१ नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंप लुटल्यानंतर सुलतानपूर येथील कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पंपावरील कर्मचारी आणि दरोडेखोरांत झटापट झाली. या झटापटीत एक दरोडेखोर जखमी झाला होता. त्यानंतर चोरटे आपले चोरीचे वाहन सोडून तेथून पसार झाले होते. त्यामुळे या दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

दरम्यान, साखरखेर्डा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी २५ नोव्हेंबर रोजी या दरोडा प्रकरणातील सचिन गजानन काळुसे (२३) रा. जागदरी, विश्वजीत विठ्ठल सिसोदिया (२३) रा. बोरजावळा, अक्षय गजानन आंभोरे रा. नायगाव, या तिघांना अटक केली होती. तर चौथा आरोपी जितेंद्र मंसराम चव्हाण (२८) रा उमरी ता. अकोट यास २७ नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे सकाळी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी शेगाव येथे सापळा रचून सिनेस्टाइल अटक केली होती. संशयितांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. चार आरोपींना दुय्यम ठाणेदार सचिन कानडे यांनी सिंदखेडराजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरोड्यातील आरोपींना तत्काळ अटक केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...