आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंद्यांमध्ये वाढ:मलकापूर पांग्रा - बिबी सीमेवर अवैध धंद्यांमध्ये वाढ

मलकापूर पांग्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती बेरोजगारी आणि दुसरीकडे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक रुजू झाले असताना मलकापूर पांग्रा येथील अवैध धंदे साखरखेर्डा पोलिसांनी बंद केले होते. त्यानंतर संबंधितांनी बिबी परिसरात अवैध धंदे सुरू केले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.काही दिवसांपूर्वी सारंग आवाड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर यंत्रणा अधिक सतर्क केली आहे.

दुसरीकडे मात्र परिसरात अवैध धंद्यांनी कळस गाठला आहे. मलकापूर पांग्रा हे संवेदनशील गाव आहे. अनेकदा येथे स्थिती तणावाची होत असल्याने कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, बिबीचे ठाणेदार लहू तावरे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना एकप्रकारे अभय दिल्याचे दिसून येत आहे.

मलकापूर पांग्रा - बिबी सीमारेषेवर त्यांनी एकप्रकारे अशा धंद्यांना परवानगी दिल्याने परिसरातील विद्यालयाचे विद्यार्थी याकडे वळत असल्याने चित्र आहे. दरम्यान, माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ठाणेदार तावरे यांना हे धंदे बंद करण्याचा आदेश दिला. मात्र, त्यांनी हा आदेश नाकारत हे धंदे सुरूच ठेवल्याचे दिसत आहे. याबाबत आता जिल्हा पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वाँचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...