आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने नुकतीच पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा हप्ता वाढवला आहे. या दोन्ही विमा योजना केंद्र सरकारच्या प्रमुख विमा योजनांमध्ये समाविष्ट आहेत. केंद्र सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक हप्ता आता ३३० रुपयांवरून ४३६ रुपये केला आहे. तसेच पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम बारा रुपयांपासून वाढवून वीस रुपये करण्यात आला आहे. हे नवे दर मागील १ जूनपासून लागू झालेत. ही योजना गरीब व सामान्य वर्गासाठी लाभदायक असली तरी या वाढीव हप्त्यांच्या भुर्दंड गोरगरीब लाभार्थ्यांना सहन करावा लागणार आहे.
विमा ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक बाब असली तरी गरीब व सामान्य लोकांना जिथे रोज काम करून पोट भरावे लागते. तिथे विमा काढणे ही दूरची गोष्ट आहे. विमा ही आवश्यक बाब हे पटवून देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तथापि उपरोक्त दोन्ही सरकारी विमा योजना चांगल्या आहेत. मात्र आपल्या बँक खात्यात कसेतरी काटकसर करून आतापर्यंत ते ठराविक रक्कम वाचवून ठेवत होते. त्यांना आता ३३० रुपयावरून ४३६ रुपये ठेवावे लागणार आहेत. या दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून दाव्याची रक्कम जमा केली जात आहे. या दोन्ही योजनांच्या हप्त्यामध्ये मागील सात वर्षांत कुठलाही बदल करण्यात आला नव्हता. नवे दर अन्य खासगी विमा कंपन्यांनाही योजना लागू करण्यास प्रोत्साहित करतील. यामुळे विमा योजनांच्या लाभार्थीच्या संख्येत घट येण्याची शक्यता आहे.
असा मिळणार विम्याचा लाभ: पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक प्रीमियमवर दरवर्षी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. हा टर्म इन्शुरन्स असल्याने, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतरच यामध्ये कव्हरेजचा लाभ मिळेल. मुदत संपल्यानंतरही तो ठीक राहिल्यास योजनेंतर्गत कोणताही लाभ दिला जाणार नाही. तसेच त्या व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही.पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रुपये मिळतात.
या योजनेचा लाभ अठरा ते पन्नास या वयोगटातील कुठलाही व्यक्ती घेऊ शकतो. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत दुर्घटनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण दिव्यांगत्व प्राप्त झाल्यास लाभार्थीस दोन लाख रुपयांची भरपाई मिळते. या योजनेच्या अंतर्गत विमाधारक आंशिक दृष्टया दिव्यांग झाल्यास त्याला एक लाख रुपयाची मदत मिळते. या योजनेत अठरा ते सत्तर या वयोगटातील कुठलाही व्यक्ती सामील होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.