आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी:जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ ; बिरसा मुंडा चौकातून दुचाकी लंंपास

दिग्रस21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बिरसा मुंडा चौकामध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी दुचाकी उभी करून गेलेल्या इसमाची दुचाकी काही क्षणातच लंपास झाली. ही घटना रविवार, दि. ४ सप्टेंबरला दुपारी भरदिवसा घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, भीमराव शंकर बोरचाटे वय ४५ वर्ष रा. धानोरा बु. ता. दिग्रस हा दिग्रस बिरसा मुंडा चौकातील महाराष्ट्र बँकेतून पैसे विड्रॉल करण्यासाठी होंडा युनिकॉन दुचाकी क्रमांक एमएच-२९-एजी-४७८४ उभी करून आतमध्ये गेले तेथे एटीएम मध्ये पैसे नसल्याने बाजूलाच असलेल्या एचडीएफसी बँक एटीएममध्ये पैसे विड्रॉल करण्यास गेले. पैसे विड्रॉल करून येताच काही क्षणातच दुचाकी लंपास झाली. याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने, रवींद्र जगताप, ब्रम्हानंद टाले, शालिक राठोड, केशव चव्हाण , ज्ञानेश्वर बोबंले पोहचून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, आरोपीचा लवकरच शोध लागणार असून आरोपी ताब्यात घेतल्या जाईल असे पोलिसांनी सांगितले. दिग्रस शहरात काही महिन्यांपूर्वी बऱ्याच वाहनांच्या चोरी झाल्या असून दिग्रस शहरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. नव्याने रुजू झालेले ठाणेदार धर्मराज सोनुने चोरट्यांना लगाम लावतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...