आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎:हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवून‎ शेतकऱ्यांना नोंदणीस मुदवाढ द्या‎

बुलडाणा‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी खासगी बाजारात हरभरा‎ उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव आहे.‎ त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी‎ केंद्राकडे वळत आहे. गेल्यावर्षी‎ जिल्ह्यात ७५ खरेदी केंद्र होती तर‎ यावर्षी केवळ २४ खरेदी केंद्र चालू‎ आहे. सदर खरेदी केंद्रांची संख्या‎ वाढवावी, फार्मर प्रोड्युसर‎ कंपन्यांनाही खरेदीस परवानगी‎ द्यावी, तसेच नोदंणीसही मुदतवाढ‎ द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते‎ रविकांत तुपकर यांनी‎ जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.‎ रविकांत तुपकर यांनी‎ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह व‎ फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या‎ प्रतिनिधींसह ६ मार्च रोजी‎ जिल्हाधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड‎ यांची भेट घेतली.

हरभरा खरेदी‎ केंद्रांमध्ये वाढ करावी, या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मागणीसह पीकविमा, अतिवृष्टीची‎ नुकसान भरपाई व बँकांच्या‎ सक्तीच्या वसुलीबाबत त्यांनी‎ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.‎ सोयाबीन-कापसाला भाव नाही,‎ अशा परिस्थितीतही बँकांकडून‎ कृषि व कृषिपुरक कर्जाची सक्तीने‎ वसुली चालू आहे, त्यामुळे शेतकरी‎ हवालदिल झाले आहेत सदर‎ सक्तीची वसुली तातडीने‎ थांबविण्यात यावी, अशी मागणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व‎ मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा‎ केली व शासनस्तरावर पाठपुरावा‎ करण्याचे आश्वासन दिले. यावेळी‎ राष्ट्रवादीचे नेते तुकाराम अंभोरे‎ पाटील, रमेश ठोकरे, प्रल्हाद‎ सुरडकर, रामभाऊ वाणी, शेख‎ रफिक शेख करीम, अक्षय‎ भालतडक, दत्ता जेऊघाले,‎ आकाश माळोदे व शेतकरी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...