आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शेतकऱ्यांचा हरभरा पडून, खरेदीचे उद्दिष्ट वाढवा; खा. जाधव यांची मागणी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी भाव हरभऱ्याला आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणला. मात्र, खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत अचानक खरेदी केंद्रे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हरभरा पडून आहे. तोंडावर आलेल्या खरीप हंगामाला सामोर जाण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे तत्काळ हरभरा खरेदी उद्दिष्ट वाढवावे आणि खरेदी केंद्र सुरू करावे अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे.

बी -बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांना पैशांची आता गरज आहे. राज्यात हरभऱ्याचे उत्पादन यंदा चांगले झाले. या हरभऱ्याचे गुणवत्ता चांगली आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने ही हितावह बाब आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव हरभऱ्याला मिळाला. त्यामुळे शासनाच्या वतीने उघडण्यात आलेल्या शासकीय हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीला पसंती दिली. मात्र, दुसरीकडे राज्यांना देण्यात आलेले हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत केंद्र शासनाच्या वतीने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांमध्ये यामुळे असंतोष पसरला असून हजारो टन हरभरा शेतकऱ्यांच्या घरात सध्या पडून आहे.

त्यामुळे ही खरेदी केंद्रे सुरु न झाल्यास अथवा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न मिळाल्यास शेतकऱ्यांचा हरभरा हा कवडीमोल भावाने त्यांना खुल्या बाजारात विकावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे लहान-मोठ्या शेतकऱ्यांकडे देखील हा हरभरा घरात साठवून ठेवण्याची क्षमता उपलब्ध नाही. त्यामुळे हंगामाला सामोरे जाण्यासाठीची लगबग पाहता त्यांना हरभरा बाजारात कमी भावाने विकावा लागेल. त्यातून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे तात्काळ हरभरा खरेदीचे उद्दिष्टसीमा, वेळ वाढवावी आणि खरेदी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...