आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप:जुन्या पेन्शनसाठी उद्यापासून‎ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप‎

बुलडाणा‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन मिळावी, यासाठी सरकारी,‎ निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, नगरपालिका‎ व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी येत्या १४ मार्च पासून‎ बेमुदत संपाची हाक दिली आहे. हा संप यशस्वी‎ करण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची सभा पार‎ पडली.‎ सर्वसामान्य कर्मचारी आपल्या आयुष्याची‎ तीस ते पस्तीस वर्षे सेवा करतात. म्हातारपणी‎ उदरनिर्वाह करण्यासाठी पेन्शन नसल्याने‎ त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे जुनी‎ पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर‎ मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.‎

समन्वय समितीच्या सभेत १४ मार्चपासून‎ कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याने‎ आपल्या जवळील चाव्या १३ मार्च रोजी‎ आपल्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपवाव्यात‎ असे ठरले. बैठकीला तेजराव सावळे पाटील,‎ किशोर हटकर, नंदकिशोर सुसर, गजानन‎ मौतेकर, अमोल देंगे, मंजीतसिंग राजपुत,‎ विलास रिंढे, अनिल वाघमारे, गजानन वाघमारे,‎ धनराज धंदर, संजय खर्चे, भाऊराव बेदरकर,‎ पूजा जाधव, सोनल वाघमारे, वंदना वराडे,‎ अपेक्षा जाधव, सुनीता चित्ते, दादाराव शेगोकार,‎ हुसेन कुरेशी, अनिल लोखंडे, समाधान वाघ,‎ दिलीप दांदडे, राजेंद्र धोंडगे, सचिन ठाकरे,‎ श्रीकृष्ण कुटे, रामेश्वर जाधव, सुरेश जगताप,‎ अमित घोगलिया, अशोक इंगळे व पदाधिकारी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...