आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला इशारा:निकृष्ट पाणंद रस्त्याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपोषण

मलकापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळखुटा महादेव येथील गट नंबर ९३ मधील पाणंद रस्त्याचे खडीकरण करण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अंदाजपत्रकानुसार पन्नास टक्के सुध्दा या रस्त्याचे काम दर्जाचे झाले नाही, या कामात मोठ्या प्रमाणात पिवळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे. या कामाची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे या निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा २६ जून पासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा विजयसिंह चव्हाण यांनी दिला आहे. या पाणंद रस्त्याचे काम सुरू असतानाचे फोटो, व्हिडिओ, शाखा प्रबंधक मोरे व कार्यकारी अभियंता बुलडाणा यांना समाजमाध्यमा द्वारे पाठवले. एवढेच नव्हे तर फोन करून संपूर्ण माहिती दिली. १ एप्रिल रोजी तक्रार अर्ज दिला. आपले सरकार पोर्टलवर देखील ऑनलाईन तक्रार केली. मात्र या तक्रारीची साधी दखल घेण्यात आली नाही त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत कारवाई करुन हा रस्ता अंदाजपत्रकानुसार न बनवल्यास २६ जून पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा विशाल विजयसिंह चव्हाण यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...