आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची आवक घटली; मागणी वाढली

मोताळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे सर्व सण उत्सव हे घरातच साजरे करण्यात आले. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच बापाच्या आगमनास अवघ्या काही तासाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शहरात बऱ्याच दिवसापासून गणेश मूर्त्यांची दुकाने थाटली आहेत. जागोजागी थाटलेली बाप्पाच्या मूर्त्यांची दुकाने तसेच त्यांना लागणारे सजावटीच्या सामानाची दुकाने ही मूर्त्यांच्या दुकानाला लागूनच दिसून येत आहेत. बाप्पाच्या मूर्त्यांच्या दुकानामध्ये लहान-मोठ्या मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आहेत. तालुक्यातील रिधोरा जहागीर येथील नेताजी बडगे हे मागील अनेक वर्षांपासून मोताळा येथे राहतात त्यांचा मागील तीन पिढ्यांपासून मूर्ती बनवण्याचा व विक्रीचा व्यवसाय आहे.

जवळपास पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून बडगे हे मूर्ती बनवण्याचा व विक्रीचा व्यवसाय करीत असून हाच व्यवसाय त्यांच्या उदरनिर्वाहाचे देखील साधन झाले आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे बाजारात पर्यावरण पुरक मातीच्या गणेश मूर्त्यांची मागणी वाढली आहे. परंतु बाजारात माल उपलब्ध नसल्याने पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्त्यांची संख्या कमी आहे तसेच यंदा मूर्त्यांच्या किंमतीत मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर पर्यावरणपूरक आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात फरक दिसून येत असला तरी ही पर्यावरणपूरक गणेश मूर्त्यांची मागणी वाढली आहे. परंतु बाजारात मुबलक प्रमाणात पर्यावरणपूरक गणेश मूर्त्यांची आवक घटल्याने नाईलाजाने भाविकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेत आहेत.

मंडळांकडून दीड महिन्याआधी मोठ्या गणेश मूर्तीची बुकींग
भाविकांना बाप्पाच्या मूर्तीसाठी एक ते दिड महिन्याआधी करावी लागते बेकींग बाजारात बाप्पाच्या मूर्तीची वाढती मागणी पाहता शहरासह आसपासच्या गावातील नागरिकांना मोठ्या बाप्पाच्या गणेशमूर्त्यांसाठी जवळपास एक ते दिड महिन्याआधी मूर्तीची बेकींग करावी लागते. कारण वेळेवर मोठ्या मूर्त्यांची आवक कमी आणि मागणी जास्त असते तर कोणीही भाविक बापाच्या मूर्तीपासून वंचित राहू नये, यासाठी आधीच बेकींग करण्याच्या सूचना भाविकांना दिलेल्या असतात तर त्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हीही दिवसरात्र मेहनत घेत असतो.
पृथ्वी नेताजी बडगे, मूर्तिकार मोताळा.

बातम्या आणखी आहेत...