आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपब्लिकन सेनेची मागणी:मातंग समाजावर अन्याय; ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवा

चिखली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातंग समाजावर अन्याय करणाऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेने केली.निवेदनानुसार, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोखरी गावात ग्रामपंचायतीच्या हातपंपावर मातंग समाजबांधवांना पाणी भरू दिले जात नाही. पंपावरून पाणी भरल्यास तुमचे हात पाय तोडू अशा धमक्या जातीयवादी गावगुंडांनी दिल्या. नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे. परंतु अद्यापही राज्यात मातंग समाजावरील अन्याय अत्याचारात वाढ होत आहे.

मातंग समाजाचे घर जाळणे, त्यांना गावाबाहेर काढून देणे, जातीवरून शिवीगाळ करणे सुरूच आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी शासनाने जातीयवादी गावगुंडाचा बंदोबस्त करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावे, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, उपाध्यक्ष ब्रह्मा साळवे, जिल्हा महासचिव शेख सलीम, युवा जिल्हाध्यक्ष लखन कुसळकर, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, कार्याध्यक्ष सतीश इंगळे, दीपक तायडे, पवन घोडे, अविनाश खरे, संजय मोहिते, अबू मोहिते, मदन नेवरे, गजराज जाधव यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...