आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन अहवाल:केंद्राच्या ‘पीआरसी’कडून ग्रामपंचायतीची तपासणी ; केंद्राचे पथक सिंदखेडराजा तालुक्यात दाखल

किनगाव राजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राचे पीआरसी समिती पथक सिंदखेडराजा तालुक्यात दाखल झाले असून त्यांनी किनगाव राजाच्या ग्रामपंचायत सेवा कार्यालयाची २९ ऑगस्ट रोजी तपासणी केलीं. दरम्यान, या समितीने बॅनर, रेटकार्ड, ऑफिस स्वच्छता, ग्रामपंचायतचे १ ते १३ पर्यंतचे नमुने, दैनंदिन ऑनलाइन अहवाल, १ ते ११ आज्ञावली, दाखले १ ते ७, सीएससी व एमओएलसह आवश्यक रेकॉर्ड, फाईल तयार ठेवणे यासह आदी मुद्द्यांची तपासणी केंद्र शासनाच्या पीआरसी समितीने केली. दरम्यान, केंद्र शासनाच्या या समितीने किनगाव राजा ग्रामपंचायतसह दुसरबीड व आरेगाव येथील ग्रामपंचायतीला भेटी देऊन पाहणी केली. केंद्र शासनाच्या या समितीचे प्रमुख अरूण कुमार असून कन्सल्टंट एमओपीआर शुभदा गुर्जर, अमरावती विभागाचे उपआयुक्त मधुकर वासनिक तर यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा राजेश लोखंडे, गटविकास अधिकारी औरंगाबाद ओमप्रकाश रामावत, गटविकास अधिकारी सिंदखेड राजा वेणीकर, घुगे, विस्तार अधिकारी पवार, सचिव काळुसे तथा सरपंच व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...