आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोणार:लोणार सरोवरातील गुलाबी झालेल्या पाण्याची निरीकडून तपासणी

लोणार10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्रिसदस्यीय पथकाने घेतले पाण्याचे नमुने, सरोवराच्या जलपातळी 1 इंचाने वाढली

वैशिष्ट्य पूर्ण असलेल्या लोणारच्या सरोवरातील खऱ्या पाण्याचा रंग का बदलला याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने आज निरीच्या तीन सदस्यीय टीमने भर पावसात सरोवरात जाऊन पाण्याचे नमुने घेतले आहे.

वन्यजीव विभागाने पाठविले नमुने व्यवस्थित नसल्याने आज पुन्हा पाण्याचे आणि खडक, मातीचे नमुने घेण्यासाठी निरीचे डॉ अतुल मालधुरे , डॉ जी. के. खडसे, आणि महेश कुमार यांनी लोणार सरोवराला भेट दिली. यावेळी डॉ अतुल मालधुरे यांनी सांगितले की साधारणतः पाण्याचा टीडीएस हा ४०० - ४५० पर्यंत असतो परंतु लोणार सरोवरातील खऱ्या पाण्याचा टीडीएस हा १६ हजार एवढा आहे. प्रमाणापेक्षा जास्त खार पाणी असल्यामुळे यामध्ये दरवेळेस नवीन बीक्टेरियांची उत्पत्ती होत राहते यावेळे कडक उन्हळ्यात सरोवरातील पाण्याच्या पातळीत मोठता प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सरोवरातील पाण्याचे नमुने प्रत्यक्ष तपासल्याखेरीज निश्चित कारण सांगणे योग्य नाही, परंतु हे का घडले असावे, याच्या शक्यता नक्कीच सांगता येतील.

लोणार सरोवराची माहिती

लोणार सरोवर हे सुमारे साठ हजार वर्षापुर्वी अशनी वर्षावामुळे तयार झाले आहे. बेसॉल्ट खडकात (आपला काळा पाषाण) असलेले अशा प्रकारे तयार झालेले हे एकमेव सरोवर. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे क्षारयुक्त पाणी.आणि त्या पाण्यात वाढणारे सूक्ष्मजीव आणि त्यांनी तयार केलेली रंगद्रव्ये. यामध्ये आजपर्यंत तीन प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा प्रमुख सहभाग असल्याचे आढळून आले आहे-

डुनालियेला सलीना या प्रकारची एकपेशीय शेवाळ (अल्गी),

हॅलोबॅक्टेरीएसी या वर्गातील जीवाणू.

सलिनी बॅक्टेरियम या वर्गातले जीवाणू

हे सर्व सूक्ष्मजीव विशिष्ट प्रकारची रंगद्रव्ये तयार करतात. त्यांच्यामुळे पाण्याला गुलाबी रंग येतो. डुनालियेला सलिनाची रंगद्रव्ये बिटा कॅरोटीन प्रकारची रंगद्रव्ये तयार करतात. हॅलोबॅक्टेरीएसी ५० कार्बनचे अणू असलेली बॅक्टेरीओरुबिन प्रकारची, तर सलीनीबेक्टर कार्बनचे ४० अणु असलेली सलिनिजांथिन प्रकारातली रंगद्रव्ये तयार करतात.

काही विशिष्ट परिस्थितीत या जीवांची संख्या वाढते किंवा संख्या तीच राहते, पण ते जास्त प्रमाणात रंगद्रव्य तयार करतात आणि हा गुलाबी रंग जास्त प्रकर्षाने जाणवतो. यातले एक कारण म्हणजे तापमानाची वाढ. तापमान वाढले की  तलावातल्या पाण्याचे बाष्पीभवन होते. पाणी कमी उरल्यामुळे त्यात क्षारांचे प्रमाण वाढते. ही परिस्थिती या जीवांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते आणि पाण्याचा रंग गुलाबी होतो. लोणारच्या बाबतीतही असेच काही घडले असावे परंतु अभ्यासा शिवाय कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल यामुळे पाण्याच्या रंग बदलण्याच्या प्रकियेचा लवकरच अभ्यासपूर्ण रिपोर्ट सादर करू असेही यावेळी डॉ अतुल मालधुरे यांनी यावेळी सांगितले. सरोवराच्या आत बोट टाकून वेगवेगळ्या ठिकाणचे महत्वपूर्ण पाण्याचे नमुने यावेळी त्यांनी गोळा केले यावेळी त्यांच्या सोबत वन्यजीव विभागाचे कर्मचारी कैलास सरकटे यांसह वनमजुर उपस्थित होते.

सरोवराच्या जलपातळी 1 इंचाने वाढली

सातत्याने पडणाऱ्या अपुऱ्या पावसामुळे सरोवराच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली होती परंतु गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सरोवराच्या पाण्याच्या पातळीत १ ईंचाची वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. पाण्याच्या पातळीतील वाढीमुळे सरोवराच्या पाण्याच्या रंगात ही हिरवे पण येत आहे.

बातम्या आणखी आहेत...