आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण होत असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याची रविवारी पाहणी केली. यादरम्यान जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. अॅड. आकाश फुंडकर, संजय रायमूलकर, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक सारंग आवाड आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत मेहकर इंटरचेंज गाठले. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खा. प्रतापराव जाधव यांनी स्वागत केले. यावेळी छ. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्ह्यात महामार्गावर मेहकर आणि देऊळगाव राजा येथे दोन इंटरचेंज देण्यात आले आहेत. जिल्ह्यात ८९ किमीचा मार्ग उभारण्यात आला आहे. हा मार्ग जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे. या मार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्यानंतर त्यांनी सिंदखेड राजाकडे प्रयाण केले.यावेळी सेना जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, विनोद वाघ, युवा सेना कार्यकारिणी सदस्य ऋषी जाधव, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळुकर, शहर प्रमुख जयचंद बाठिया, युवा सेना तालुका प्रमुख भूषण घोडे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.