आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षण:विभागीय व्यवस्थापकांकडून शेगाव रेल्वे स्थानकाचे निरीक्षण ; रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना

शेगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या शेगाव स्थानकाला भुसावळ विभागीय व्यवस्थापक एस. एस. केडीया यांनी प्रवाशांना लागणाऱ्या सेवा सुविधांच्या अनुषंगाने रेल्वेस्थानकावर कामांची पाहणी करीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. या भेटी दरम्यान डीआरएम यांनी प्रवाशांसाठी लिफ्ट व स्वयंचलित पायऱ्यांचे काम सुरू करण्याचे तसेच रेल्वेच्या पार्किंग मध्ये रेस्टॉरंट ऑल व्हीलचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

शेगाव रेल्वे स्थानक हे अ दर्जाचे रेल्वेस्थानक असून या स्थानकावर असणाऱ्या प्रवासी सेवा सुविधा देखील त्याप्रमाणे असाव्यात, त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी व प्रस्तावित कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यासाठी व स्थानकाचे निरीक्षण करण्यासाठी भुसावळ विभागाच्या डीआरएम केडीया यांनी आज सोमवारी शेगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. भुसावळ रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या मलकापूर, शेगाव आदी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांचा आढावा घेण्यासाठी त्यांचा हा दौरा होता. येथील रेल्वे स्थानकावर पोहोचून त्यांनी येथील सेवा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेतून अशी माहिती मिळाली की, कोरोना नियमांची २९ जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. यानंतर रेल्वे आपल्या पूर्वीच्या सेवा आणि सुविधा प्रदान करेल. असे ते म्हणाले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ मंडल परिचालन व प्रबंधक आर. के. शर्मा, डीआरएमएसएनटी द्विवेदी अरुण कुमार यांच्यासह स्थानिक रेल्वे स्थानकाचे सर्व विभाग प्रमुख, रेल्वे वाणिज्य विभागाचे अधिकारी मोहन देशपांडे, रेल्वे स्थानक प्रमुख तथा रेल्वे सल्लागार समितीचे सचिव पी.एम.पुंडकर, रेल्वे सल्लागार समितीचे कार्यकर्ते, आरपीएफ आणि जीआरपी विभागाचे पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...