आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईमानदारी:वातानुकूलित वातावरणात वावरणाऱ्या बॉम्ब शोधक पथकातील ‘डॉन’कडून भर उन्हात तपासणी; गरमीमुळे होते जीवाची लाहीलाही

वर्धा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्य कोपला असून वर्ध्यात जीवाची लाहीलाही होत आहे. अशा स्थितीतही राजकीय कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या कार्यक्रमात व पर्यटनस्थळी कुठल्याही प्रकारच्या घटना अथवा दंगल घडू नये, यासाठी वातानुकूलित वातावरणात वावरणाऱ्या बॉम्ब शोधक पथकातील डॉनकडून तप्त उन्हात कार्यक्रम व पर्यटन स्थळाची तपासणी केली जात आहे.

पोलिस विभागात कर्तव्यावर असलेला डॉन हा सात वर्षांचा असून, तो पाच वर्षांपासून सेवेत रुजू झाला आहे. पोलिस विभागाकडून डॉनवर सर्व खर्च केला जातो. जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर राजकीय कार्यक्रम असल्यास कार्यक्रमस्थळी कुठल्याही प्रकारची घटना घडू नये, यासाठी जाऊन कार्यक्रम स्थळाची तपासणी डॉनसह पथक करत असतात. डॉनचा दौरा असताना त्याला वातानुकूलित वाहनांमधून प्रवास करण्याचे आदेश पोलिस विभागाने दिले असले तरी वर्ध्यातील पोलिस विभागाकडे वातानुकूलित वाहन उपलब्ध नसल्याने, डॉनला साध्या वाहनातून कार्यक्रमस्थळी जावे लागत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. नागरिक सुद्धा दुपारच्या वेळात घरांमधून बाहेर पडत नाहीत. मात्र पोलिस विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉनला तीनही ऋतू सारखेच असल्याचा भास पोलिस विभाग दाखवत आहेत. अमरावती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची सभा तप्त उन्हात आयोजित करण्यात आली असता, त्या कार्यक्रमाची तपासणी करण्याकरता डॉन व पथक साध्या वाहनाने गेले होते.

तर सेवाग्राम आश्रमात देश विदेशातील पर्यटक आश्रम बघण्यासाठी येत असल्याने, त्या परिसराची तपासणी सुद्धा डॉनकडून केली जाते. पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी तप्त उन्हात डॉनला घेऊन सेवाग्राम आश्रम परिसराची तपासणी केली जावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान डॉनला तप्त उन्हाचे चटके लागत होते. मात्र तो बोलून दाखवत नव्हता, तर त्याची दमछाक होत असल्याचे स्पष्ट दिसून येत होते.

डॉनला शुद्ध शाकाहारी जेवण
डॉन हा वयाच्या दोन वर्षांपासून पोलिस विभागात कार्यरत असून त्याला शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाते आणि डॉनला थंड वातावरणात राहणे आवडते.
प्रमोद दुरतकर, बॉम्ब शोधक पथक प्रमुख

बातम्या आणखी आहेत...