आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यप्रदेश, जळगाव खान्देश व बुलडाणा जिल्ह्यांतून दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी १२ लाख ६० हजार रुपये किमतीच्या २१ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२१ जुलै रोजी शहरातील द्वारकानगर येथील राम विजय राऊत यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल झाली होती. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शहर डीबी स्कॉडच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दुचाकी व आरोपींचा शोध घेण्यासाठी अट्टल दुचाकी चोर आकाश उर्फ संतोष रावळकर, राम शंकर मनोहर भोलनकर, पवन संजय जवरे, प्रशांत समाधान बोरले सर्व रा. कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, अमरदीप बाबुराव उमाळे बहापुरा ता. मलकापूर, संतोष समाधान कवळे रा. आडविहीर ता. मोताळा यांना अटक केली. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी राज्यासह राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणावरून दुचाकीची चोरी करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी विकल्याचे सांगीतले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून विविध कंपनीच्या १२ लाख ६० हजार रुपये किमतीच्या २१ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच यावेळी चोरट्यांनी जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, वर्धा येथे चोऱ्या केल्याची कबुली दिली. ही कारवाई डीबी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे, पोलिस उपनिरिक्षक बालाजी सानप, पोहेकॉ मुंडे, पोकॉ ईश्वर वाघ, पोकॉ संतोष कुमावत, गोपाळ तारुळकर, अनिल डागोर, आसिफ शेख, सलीम बर्डे, प्रमोद राठोड यांनी केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे हे करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.