आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ आज ६ फेब्रुवारी रोजी नांदुरा रोडवरील एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर कॉग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारने अदानी समूहाचे जवळपास ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मोठे मोठे उद्योग, रेल्वे स्टेशन, हवाई अड्डे, विद्युत प्रकल्प यासारख्या अनेक संस्था अदानी समूहाला देण्याचे काम करुन मोदी सरकार निवडक उद्योग पतींवर मेहरबानी दाखवत आहे.
अदानी समुहाने केलेल्या गैरकारभारामुळे एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया मधील पॉलिसी धारक व गुंतवणुकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणार्या हिंडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे तसेच मुख्य न्यायाधीशाच्या देखरेखीखाली चौकशी करावी. तसेच गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने योग्य ते निर्णय घ्यावे, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिला आहे.
या आंदोलनात सरस्वती खासने, मनोज वानखडे, विजय काटोले, सुरजितकौर सलुजा, किशोरआप्पा भोसले, पंजाबराव देशमुख, श्रीकृष्ण टिकार, चैतन्य पाटील, मनीष देशमुख, गणेश ताठे, बबलू पठाण यांच्यासह सरपंच विनोद मिरगे, नीलेश देशमुख, पवन पवार, इब्राहिम खॉ सुभान खॉं, मो.नईम, शेख रशीद शेख उस्मान, राजु पटेल, अस्लम पटेल, गब्बर भाई, सुरेश बोरकर, यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.