आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा दणका:लग्नात वऱ्हाडींना जेऊ घालणेही परवडेना, किराणा अन् गॅसचे दर वाढल्याने जेवणाचे ताटही महागले

बुलडाणा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाद्यपदार्थांच्या पॅकिंग वस्तूंवरही जीएसटी लागल्याने महागाईत वाढ झाली आहे. आधीच गॅस महाग असताना किराणाही महागात खरेदी करावा लागत असल्याने कोरोनानंतर रुळावर आलेली सर्वसामान्यांची आर्थिक गाडी महागाईने पुन्हा एकदा घसरु लागली आहे. ऐन सणासुदीत हा फटका सामान्यांना बसत असून यामुळे घरातील जेवणाचे ताटही महागले आहे तर येणार्या काळात लग्न मुहुर्तापर्यंत ही महागाई कमी न झाल्यास वर-वधू पित्यास वऱ्हाडींना जेऊ घालणेही महागात पडणार आहे.

तेलाचे भाव कमी करत असले तरी इतर भाव मात्र जैसे थे आहेत. सध्या कोणत्याही वस्तु पँकींगच्याच खरेदी केल्या जात आहे. काही ब्रॅँडेड कंपनीचाच माल घेण्याकडे गृहिणींचा कल असतो. या वस्तुंपासुनच घरातील खाद्य पदार्थ बनवले जात आहे. आता पितृपक्ष सुरु असून पितर घालण्यासाठी किराणा खरेदी करणे सुरु आहे.

त्यामुळे महागाईचा दणका आतापासूनच बसू लागला असून रविवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर त्यानंतर आठ दिवसात दसरा व पंधरा दिवसात दिवाळी सण येत आहे. हे सण महत्वाचे असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे ही महागाई मोडणार असल्याचे दिसते.

दरम्यान, दिवाळीनंतर लग्नाचे मुहुर्त राहणार आहेत. स्थळे पाहण्यासाठी आता पासुनच सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातच सहा तर डिसेंबर महिन्यात मुहुर्त आहेत. त्यामुळे दिवाळीपाठोपाठ लग्नाचाही खर्च परवडण्यासारखा राहणार नसल्याने सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर ही महागाई चालली आहे. या लग्न कार्यात कॅटरिंग वाल्यांना बोलवावे लागते. मात्र किराणा महागल्याने त्यांनाही एका जेवणाचे ताट चाळीस पन्नास रुपयाने महाग द्यावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...