आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाच्या खाली आढळले होते प्रेत:त्या अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केल्याचे उघड; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

खामगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव-मेहकर रोडवर असलेल्या शिर्ला नेमाने जवळील पुलाच्या खाली एका २५ ते ३० वर्ष वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी २२ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञाताविरूद्ध उशिरा खुनाचा गुन्हा दाखल दाखल केला आहे. मागील २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान मेहकर रोडवरील शिर्ला नेमाने पुलाच्या खाली एका अनोळख महिलेचा मृतदेह पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना दिसून आला होता.

याबाबतची माहिती शिर्ला नेमानेचे पोलिस पाटील भानुदास पाटील यांना सुध्दा मिळाली. त्यांनी लगेच हिवरखेड पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच हिवरखेड पोलिस तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत हिवरखेड पोलिसांनी प्रथम दर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनाच्या अहवालावरुन त्या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोहेकॉ रामेश्वर राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...