आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:केंद्राच्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही भाजपची; आमदार कुटे

जळगाव जामोद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजना ह्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार संजय कुटे यांनी केले.

भाजपाची स्थापना होऊन आज ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्त जळगाव जामोद मतदार संघाच्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार डॉ संजय कुटे यांच्या निवासस्थानी स्क्रीन लावून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन कार्यकर्त्यांनी ऐकले. या अगोदर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपा पक्षाचा झेंडा लावला. यावेळी एका युवा कार्यकर्त्यांचा केवळ सोशल मीडियावर मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक पोस्ट टाकल्यामुळे जप्त केलेला मोबाईल दीड वर्ष उलटून ही पोलीस प्रशासनाने चौकशीच्या नावाखाली अजूनही परत दिला नाही.

त्यामुळे भाजपा युवा मोर्चाने त्याला नवीन मोबाईल भेट म्हणून दिला. यातून भाजपा हा नुसता पक्ष नसून एक परिवार असल्याचे सिद्ध होत आहे. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ डॉ संजय कुटे, जिल्हा महामंत्री नंदू अग्रवाल, जि. प विरोधी पक्ष नेता बंडू पाटील, माजी नगराध्यक्ष सीमा डोबे, अपर्णा कुटे, चंदा पुंडे, लता तायडे, सुचेता उमाळे, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, संग्रामपूर तालुका अध्यक्ष लोकेश राठी, अविनाश धर्माळ, रामदास म्हसाळ, विठ्ठल वाघ, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, युवा मोर्चा उपाध्यक्ष राम इंगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष उमेश येउल, माजी नगरसेवक शैलेंद्र बोराडे, आशिष सारसर, नीलेश शर्मा, रमेश कोथळकार, शरद खवणे, अरुण खिरोडकार, नाना धंदर, अंबादास शेळके, बाळू कुटे, डॉ प्रकाश बगाडे, गणेश अप्पा सोनटक्के, गोटू खत्ती, सखाराम ताडे, कैलास पाटील, पांडुरंग मिसाळ, सुनील रघुवंशी, अजय वंडाळे, मोहित सरप, गणेश दांडगे, करणसिंग राजपूत, अमोल भगत, रामू खोंड, अमोल ढगे, अजय धर्मे, सतीश फुसे, रितेश आव्हेकर, शुभम चंडाले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...