आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडीत रवानगी:जळगाव जामोद पोलिसांनी बकऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

जळगाव जामोद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बकऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून वाहनासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सतत बकऱ्या चोरीच्या घटना घडत असल्यामुळे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी पोहेकॉ विनोद वानखडे यांना चोरट्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. विनोद वानखडेसह योगेश निंबोळकर, अनिल बुले यांनी आरोपींचा शोध घेतला असता बकऱ्या चोरणाऱ्यांमध्ये पाच आरोपींचा सहभाग असल्याची माहिती त्यांना मिळाली.

या माहितीवरुन पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी शेख अरबाज शेख मुक्तार व शेख समीर शेख शब्बीर या दोन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन आरोपींची माहिती दिली. या माहितीवरून आरोपी शेख मुज्जमिल व शेख साद इमाम कुरेशी यांना १ डिसेंबर रोजी अटक केली. त्यानंतर पाचवा आरोपी देवेंद्र आनंदा कुटे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...