आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक दिवसांपासून भंगार बस तशाच चालवल्या जात आहेत. यामुळे अनेक वेळा वाहकासह प्रवाशांना बसला धक्का मारावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील जयस्तंभ चौक भागात आज रविवार, ५ फेब्रुवारी रोजी अकोला कडून बुलडाण्याकडे येत असलेली बस चौकात बंद पडली. यावेळी तर वाहतुकीची कोंडी हाेत असल्यामुळे प्रवाशांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांना या भंगार बसला धक्का मारावा लागला. बुलडाणा शहरात रविवार बाजाराचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जयस्तंभ चौक परिसरात गर्दी असते. याच वेळी बसचे इंजीन गरम झाल्यामुळे बस बंद पडली. या दरम्यान त्यामुळे वर्दळीच्या चौकात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून चक्क प्रवाशांसह पोलिसांनाच या भंगार बसला धक्का मारावा लागला.
भंगार बस उठल्या जीवावर बुलडाणा जिल्ह्यातील प्रवाशांना अनेक वेळा नाहक त्रास सहन करावा लागतो. नादुरुस्त बसेस मुळे अनेकदा लहान- मोठे अपघात घडत आहेत. अशीच घटना शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी मेहकर-खामगाव मार्गावर नुकतीच एसटी बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने झाडाला धडकली. या घटनेत २५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताच्या अश्या घटनांमुळे या बसेस एकप्रकारे जीवावरच उठल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.