आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा महोत्सव:जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जिजामाता महाविद्यालय प्रथम‎

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी‎ कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद‎ बुलडाणा यांच्या वतीने २ जानेवारी रोजी‎ जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे‎ आयोजन करण्यात आले होते .या युवा‎ महोत्सवात लोकगीत या प्रकारात‎ जिजामाता महाविद्य ालयाच्या चमूने‎ प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे या‎ चमूला अमरावती विभाग स्तरावर‎ लोकगीत सादर करण्याची संधी‎ मिळाली आहे. शाहीर प्रतापसिंग‎ बोदडे यांनी लिहिलेल्या असं आहे‎ आमचं वऱ्हाड हे लोकगीत जिजामाता ‎महाविद्य ालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर‎ पद्धतीने सादर करून उपस्थित रसिकांची ‎दाद मिळवली.

विभाग स्तरावर निवड ‎ ‎ झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी‎ गणेश जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक ‎ ‎ अनिल इंगळे, प्राचार्य डॉ प्रशांत कोठे‎ यांच्यासह प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे‎ अभिनंदन केले आहे. या लोकगीतामध्ये‎ आसावरी लोखंडे, वैष्णवी रिंढे, प्रियंका‎ महाले, रवीना खरे, अंकिता सोनुने,‎ चंचल दहातोंडे अनुज राजपूत, आशिष‎ मालठाणे यांनी सहभाग घेतला होता. या‎ लोकगीतासाठी हार्मोनियम वर निकिता‎‎ फसले यांनी तर श्याम मानकर यांनी‎ तबल्यावर साथ संगत केली. या चमूला‎ प्रा गजानन लोहटे, प्रा सुभाष मोरे, प्रा‎ किरण टाकळकर यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...