आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण, खेळ तसेच इतर राष्ट्र विकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करतील अशी अपेक्षा प्राचार्य प्रशांत कोठे यानी व्यक्त केली. येथील जिजामाता महाविद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी विचार पिठावर सुरेश देवकर, रणजीत राजपूत, डॉ. स्मिता गोडे, डॉ. येरणकर, डॉ. भरत जाधव, डॉ. वंदना काकडे, डॉ. सुरेश गवई व गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. सुबोध चिंचोले उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. वंदना काकडे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकाधिक गुण संपादित करावेत. तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेचा हेतू असल्याचे सांगितले.
अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिजामाता महाविद्यालयातील प्रेम करणाऱ्या दात्यांनी उत्स्फूर्तपणे शिष्यवृत्ती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देवुन शिष्यवृत्ती वितरीत करून सन्मानित करण्यात आले. सत्र २०२२-२३ मधील एनएसएस, एनसीसी आणि विविध खेळ तसेच २५ ते २७ डिसेंबर दरम्यान, डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये विद्यापीठात कला शाखेत दहावी मेरीट आलेली सांची समदुर, वाणिज्य पदवीत्तर परीक्षेत नववा मेरीट आलेला श्रीकृष्ण कल्याणकर, दहावा मेरीट धनंजय राजणकर, आविष्कार मध्ये राज्यस्तरावर नामांकन मिळवणारी तसेच टेकलॉन २०२३ मध्ये राष्ट्रीय पातळीवर विजेती राजनंदिनी राजपूत तसेच फुटबॉल, कबड्डी व क्रिकेट या खेळात चमक दाखवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवकर यांनी विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा घेवून आपला उत्कर्ष साधला पाहिजे, असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्नेहा कोल्हे यांनी तर आभार डॉ. भरत जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. वंदना काकडे, डॉ. भरत जाधव, प्रा. सुबोध चिंचोले, डॉ. एस. एन. गवई, डॉ. डी. जे. कांदे, प्रा. पवन ठाकरे, प्रा. गजानन लोहोटे, प्रा. किरण टाकळकर, प्रा. रतन कानके व दिलीप मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.