आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे:पत्रकार भवन ज्ञानभवन,‎ संदर्भ भवन ठरायला हवे‎ ; मातृतीर्थ सभागृहाला भेट‎

देऊळगावराजा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारांची शक्ती ही क्रांतीची शक्ती‎ असते. पत्रकारितेला मिशन समजून कार्यरत‎ असलेल्या मातृतीर्थ तालुका पत्रकार‎ संघासाठी आपण योगदान देणार आहोत. हे‎ पत्रकार भवन ज्ञानभवन, संदर्भ भवन ठरावे‎ तसेच तालुका आणि शहराच्या विकासात‎ योगदान देणारे शक्ती केंद्र ठरावे, अशी‎ अपेक्षा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे‎ व्यक्त केली.‎ येथील मातृतीर्थ सभागृहाला रविवारी,‎ दि. २६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या भेटी प्रसंगी‎ डॉ. शिंगणे बोलत होते. याप्रसंगी मातृतीर्थ‎ तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा‎ सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी‎ नगराध्यक्ष गोविंद झोरे, कविश जिंतूरकर,‎ सुबोध मिश्रीकोटकर, राजीव सिरसाठ,‎ अ‍ॅड. अर्पित मिनासे, माजी नगरसेवक प्रदीप‎ वाघ, बाबासाहेब कासारे, सुनील‎ शेजुळकर, अ‍ॅड. अनिल शेळके, अरविंद‎ खांडेभराड, राजेंद्र चित्ते, रामू खांडेभराड‎ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अध्यक्षा‎ सुषमा राऊत यांनी केले. सूत्रसंचालन‎ अशरफ पटेल यांनी केले. सन्मती जैन यांनी‎ आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...