आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधनवार्ता:अपघातात जखमी पत्रकार शेख अनिस यांचे निधन

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातात जखमी झालेले तालुक्यातील वरवट बकाल येथील पत्रकार, ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी शेख अनिस शेख मोहंमद (४२) यांचे सोमवारी रात्री अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दुचाकीचा २७ ऑगस्ट रोजी संग्रामपूर पंचायत समितीसमोर अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी तब्बल १० दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर ५ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. शेख अनिस हे धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहत होते. सोमवारी मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...