आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी, दि. ९ मार्च रोजी अर्थसंकल्पात खामगाव - जालना रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार ५० टक्के भागीदारी देणार असल्याची घोषणा केली. याबद्दल रेल्वे लोकआंदोलन समिती आणि नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर साखर वाटून, फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. खामगाव - जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के निधी मंजूर करावा, ही प्रमुख मागणी रेल्वे लोकआंदोलन समितीने अनेक वर्षांपासून केली होती. आमदार श्वेता महाले यांना निवेदन देऊन समितीने मागणी राज्य सरकार पर्यंत पोहचविली. आमदार महाले यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नांमुळे अर्थसंकल्पात फडणवीस यांनी रेल्वे मार्गासाठी ५० टक्के निधी मंजूर करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर चिखलीत जल्लोष करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्वेता महाले यांचे आभार मानत रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी साखर वाटली. तसेच फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक आणि चिंच परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रा. किशोर वळसे, रेणुकादास मुळे, अनुप महाजन, संतोष अग्रवाल, भारत दानवे, माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे, सुहास शेटे, अंकुशराव पाटील, डॉ. प्रतापसिंह राजपूत, हेमंत कुचेरिया, माजी नगरसेवक गोविंद देव्हडे, नामू गुरुदासानी, सागर पुरोहित, पंजाबराव धनवे, चेतन देशमुख, गजानन कुळकर्णी, भगवान निंबाळकर, मतीन मिया, गजानन भणगे, भिकू लोळगे, प्रथमेश सदावर्ते, संजय शेळके, सिद्धेश्वर ठेंग, वृषभ शर्मा, अभि वीर, राजेंद्र हांडगे, अमित मालानी, विकास सोनूने, विजय अवचार, प्रवीण महाशब्दे, आयुष कोठारी, आनंद सराफ, सम्राट जोगदंडे, हरिहर सोळंके, कैलास भालेकर, गिरीश शिरभाते, हरीभाऊ परिहार, तेजराव सोनूने, अजय राजपूत, काशीनाथ शेळके, गोलू गिनोडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.