आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघातील आघाडीच्या विक्रमी विजयाचा बुलडाणा शहरात आज गुरुवारी संध्याकाळी जल्लोष साजरा करण्यात आला. कसबा पोटनिवडणुकीत आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजय येथील जयस्तंभ चौकात महाविकास आघाडी कडून उत्साहात साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, फडकणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे झेंडे, गगनभेदी घोषणा असा या जल्लोषाचा माहोल होता. या आनंदामुळे जणू काही जिल्ह्यातील एखाद्या मतदार संघाचा निकाल लागला की काय, असे मजेदार चित्र यावेळी दिसून आले.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अनिल बावस्कर, माजी नगरसेवक झाकीर कुरेशी, अनिल वारे, सत्तार कुरेशी, राजेश गवई, याकूब पठाण यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दत्ता काकस यांनी सांगितले की, ही तर आघाडीच्या विजयाची व भाजप शिंदे गटाच्या घसरणीची सुरुवात आहे. ये तो सिर्फ झाकी है, अभि महाराष्ट्र बाकी है असे सांगून ते म्हणाले की, २०२४ मध्ये बुलडाण्यासह महाराष्ट्रात असेच राजकीय चमत्कार घडणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.