आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:संगम चौकातील ज्युस सेंटर चोरट्यांनी‎ फोडले; 85 हजारांची रक्कम लंपास‎

बुलडाणा‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अत्यंत वर्दळीच्या‎ असलेल्या संगम चौकातील लकी‎ ज्युस सेंटर फोडून अज्ञात‎ चोरट्यांनी ८५ हजार रुपयांची रोख‎ रक्कम लंपास केल्याची घटना‎ आज गुरुवारी सकाळी उघडकीस‎ आली आहे. या घटनेमुळे‎ शहरातील व्यावसायिकांमध्ये‎ भितीचे वातावरण पसरले आहे.‎ चोरी प्रकरणातील चोरटे हे‎ सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.‎ मागील काही महिन्यापासून‎ शहरात लहान मोठ्या चोरीच्या‎ घटना घडत आहेत.

परंतु या‎ चोरट्याचा तपास लावण्यास‎ पोलिसांना अपयश येत आहे.‎ शहरासह परिसरात सतत चोरीच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घटना घडत असल्यामुळे‎ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण‎ पसरले आहे. दरम्यान, बुधवारी‎ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दोन‎ चोरट्यांनी शहरातील संगम चौक‎ परिसरात असलेले लकी ज्यूस सेंटर‎ फोडून दुकानातील ८५ हजार‎ रुपयांची रोख रक्कम लंपास केली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यावेळी चोरी करताना दोन युवक‎ सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.‎ प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात‎ दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी‎ अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हे दाखल‎ करून सीसीटीव्हीच्या आधारे‎ पोलिसांनी चोरट्याचा तपास सुरू‎ केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...