आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:पाच दिवसांपासून करांगळे यांचे उपोषण सुरू; प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही

बुलडाणा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कामचुकार व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय करांगळे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० एप्रिल पासुन उपोषणास सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही.

नांदुरा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बुलडाणा येथे मागील १ नोव्हेंबर रोजी माझ्या वडिलांनी पुराव्यानिशी तक्रार दिली होती. तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन मुख्य सहाय्यक एच. कातडे यांनी अति तातडीच्या प्रकरणात मोजणी अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. तर जनमाहिती अधिकारी संदीप टिकार या कर्मचाऱ्याने सुद्धा अति तातडीच्या प्रकरणात मोजणी फी चे चालन देण्यास अडवणूक केली.

तरी या कामचुकार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत १ नोव्हेंबर रोजी कार्यालय प्रमुखांकडे रितसर तक्रार केली होती. मात्र कार्यालय प्रमुख तथा चौकशी अधिकारी पी. एस. पाटील यांनी सुद्धा त्या मुजोर कर्मचाऱ्यांची पाठराखण केली आहे. कातडे व टिकार हे कर्मचारी दोषी असल्याचे पुरावे देऊनही त्यांनी खोटा व दिशाभूल करणारा अहवाल संगनमताने बनवल्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी दत्तात्रय करांगळे यांनी उपोषणास सुरूवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...