आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाट्या पुरवणार:डिपॉझिट ठेवा अन् रुग्णांसाठी मोफत साहित्य न्या ; बुलडाणा अर्बन सोशल सर्व्हिसेसचा उपक्रम

बुलडाणा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी व्यक्ती आजारी पडते अन् रुग्णासाठी डॉक्टर बाजारातून वस्तू विकत आणण्यास सांगतात. या वस्तू रुग्ण बरा झाल्यानंतर काहीच उपयोगी ठरत नाहीत. अशा वस्तू आता विकत घेण्याचे काम नाही. त्या वस्तूच्या किमती एवढी रक्कम डिपॉझिट ठेवावी व काम झाल्यानंतर ती वस्तू परत करून आपले डिपॉझीट परत घेऊन जावे, असा सामाजिक उपक्रम बुलडाणा अर्बन सोशल सर्व्हिसच्या माध्यमातून बुलडाणा अर्बनच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. संस्थेच्या ठेवीदारास डिपॉझिट देण्याची गरज नाही.

विवाह समारंभ, इतर शुभ कार्यक्रमांत प्लास्टिकचे ताट, वाट्या, पेले आदींचा वापर केला जातो. जो पर्यावरणासाठी व पशुधनासाठी घातक आहे. संस्थेने स्टीलच्या वाट्या, ताट व ग्लास उपलब्ध केले आहेत. यासाठी संस्था कोणतेही शुल्क आकारणार नाही. कार्य आटोपल्यावर ताट, ग्लास स्वच्छ घासून परत आणून द्यावे. संस्थेने अनाथ व दिव्यांग व्यक्तींसाठी उपक्रम हाती घेतला असून बुलडाणा शहरातील नागरिकांनी वापरलेले कपडे दान देण्याची इच्छा असल्यास असे कपडे धुऊन व इस्त्री करून चेन व बटन लावून संस्थेकडे जमा करू शकता. असे कपडे अनाथ व दिव्यांग आश्रमातील व्यक्तींना दिले जातील. पाल्य पास होवून पुढच्या वर्गात गेलेले पाल्यांची जुनी पुस्तके, वह्या शक्य झाल्यास कव्हर लावून संस्थेकडे जमा करू शकतात. ही पुस्तके गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वाटप करता येतील. एखाद्या रुग्णाचे शिल्लक राहिलेले औषध, गोळ्याही संस्थेकडे जमा केल्यास धर्मदाय दवाखान्यास पुरवण्यात येतील.

इतर सेवाही मिळणार मोफत
पेशंटला गरज असल्यास नर्स, ब्रदर्स, मसाजिस्ट, फिजिओथेरपिस्ट संस्था शुल्कावर उपलब्ध करून देेईल. तसेच घरातील किरकोळ दुरुस्ती जसे इलेक्ट्रिक टी.व्ही. फ्रीज, वॉशिंग मशिन, ए.सी. आदी दुरुस्तीसाठी तसेच प्लंबर व कार पेंटर आदींसाठी टेक्निशियन लागल्यास उपलब्ध करुन देईल. टेक्निशियन काम पाहून त्याचा मेहनताना सांगेल. त्याचेशी आपण परस्पर व्यवहार ठरवून त्याचा मेहनताना त्याला अदा करावा, त्यासाठी संस्था कोणतेही शुल्क आकारणार नाही. बुलडाणा शहरात नवीनच राहायला आलेल्या लोकांसाठी ही सेवा उपयोगाची ठरणार आहे.

काय मिळेल साहित्य
वाँकर, रक्तदान तपासणी मशीन, कफ ड्राफ्ट सँक्शन मशीन, कमोड चेअर विथ पॉट, कुबडी (चालण्यासाठी आधार), स्टीक (काठी) ३ लेग, स्टीक काठी ४लेग, रुग्णासाठी व्हिल चेअर, स्ट्रेचर , निम्युलायझर (वाफेची मशीन), सेमी फॉलोअर बेड गादी उशीसह , आयसीयू बेड गादी उशीसह , बेड साइड टेक सलाइन स्टॅंड , बेबी पाळणा, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन , हार्ट बीट, बी पी चेक कलर मॉनिटर , एअर बेड, वॉटर बेड, रुग्णाचे घरीच आय.सी.यु. रूम याकरणेसाठीचे साहित्य.

बातम्या आणखी आहेत...