आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री औंढेश्वर विद्यालयातून अनेक विद्यार्थी विविध विभागात अधिकारी पदावर असून वैद्यकीय क्षेत्रातून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवले आहे.ग्रामीण भागात एक अतिशय दर्जेदार शिक्षण देणारे हे विद्यालय असून मी देखील अतिशय लहान खेड्यातूनच आलो आहे.माझेही शिक्षण ग्रामीण भागातच झाले असून मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता भरपूर अभ्यास करून आपल्याला हव्या त्या क्षेत्रात नावलौकिक मिळवता येते.असे, प्रतिपादन ठाणेदार गणेश हिवरकर यांनी केले आहे.
स्थानिक श्री औंढेश्वर विद्यालयात वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.दिलीप सानप होते.तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार गणेश हिवरकर,सोनकांबळे,पवार, संजय सरोदे, इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सुनील राठोड होते. स्वागत समारंभानंतर वृषाली देव्हरे, तुषार राठोड, ओम बनकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.दिलीप सानप यांनी बोलताना सांगितले की, यश हे आपल्या सकारात्मक कृतीशीलतेवर अवलंबून असते,म्हणून स्वतः आत्मविश्वास बाळगून प्रत्येक गोष्ट करा म्हणजे यश नक्कीच मिळेल.
ग्रामीण-शहरी असे भेदाभेद न ठेवता एक निश्चित ध्येय समोर ठेऊन आपण सकारात्मक राहून प्रामाणिकपणे जर अभ्यास केला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही,असे प्रतिपादन केले. यावेळी चेके, गीते, हुसे, नाडे, तेजनकर, कुटे, वनवे, गवई, घुगे, डोईफोडे, मनोज सानप, कोकाटे, सोनकांबळे, विलास नागरे, राम इंगळे, अकिब, कारभारी सानप, अर्जुन आंधळे उपस्थित होते. सूत्रसंचालन हुसे यांनी तर आभार संदीप वनवे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.