आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:खामगाव: 50 केंद्रावर 66.32 टक्के मतदान

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५० मतदान केंद्रावर १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा.पासून मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी ३.३० वाजे पर्यंत एकूण ६६.३२ टक्के मतदान झाले. सर्व मतदान केंद्रावर मतदान शांततेने पार पडले. प्रभारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अतुल पाटोळे यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

मंगळवारी मतमोजणी : २० डिसेंबर रोजी त्यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. सकाळी दहा वाजेपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात मतमोजणीला ५ टेबल वरुन प्रारंभ होणार आहे. प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक व दोन सहाय्यक असे तीन जण राहणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सोळा ही सरपंच व सदस्यांचे संपूर्ण निकाल जाहीर होतील

बातम्या आणखी आहेत...