आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन वर्षापूर्वी कोरोना काळात खामगाव ते जलंब ही रेल्वे पॅसेंजर बंद करण्यात आली होती. अजूनही काही मेल, एक्सप्रेस, सवारी गाड्या जलंब येथे थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले असताना भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी यांच्याकडे विविध मागण्या रेल्वे संदर्भात केल्या होत्या. त्यापैकी खामगाव-जलंब रेल्वे पॅसेंजर सुरू करण्याची महत्वाची मागणी होती. ती आज ४ मे रोजी पूर्ण झाली आहे. उशिरा का होईना ही पॅसेंजर सुरू झाल्यामुळे हजारो प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मागील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जलंब ते खामगाव ही पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वेने मुंबई, पुणे यासह इतर मोठ्या शहरात जाण्यासाठी खामगाव व पहुरजिरा येथील प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यासोबतच अजूनही जलंब रेल्वे स्थानकावर हावडा मेलसह इतर नऊ एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नाहीत, त्यासुद्धा लवकर थांबा सुरू कराव्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुन्हा खामगाव जलंब रेल सुरू करावी, अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करून त्या बाबतचा पाठपुरावा केला होता.
अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज ४ मे रोजी सकाळी खामगाव जलंब ही रेल्वे पॅसेंजर सुरू करण्यात आली आहे. यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी रेल्वे पॅसेंजरला हिरवी झेंडा दाखविली. त्यानंतर स्टेशन मास्तर अनासने यांच्याशी विस्तृत चर्चा करून नियमित मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यानुसार खामगाव येथून रेल्वे पॅसेंजर तसेच रेल बस पूर्ववत सोडवण्यात याव्या, अशी सूचना केली. यावेळी रेल्वे चालक व प्रवाशांचे आमदार फुंडकर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर, मंगेश गायकी, तालुका उपप्रमुख, आशिष मिरगे, विभाग प्रमुख विशाल आखरे यांच्यासह गोपाल मोहे, रोशन राजपूत,बाळू फंदाट, मनोहर खोंदील, महेश देवचे, उमेश मोहे, विशाल मोहे, गजानन मोहे, गणेश मोहे, गणेश ढगे, तेजस मोहे, नितीन मोहे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.