आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न निकाली‎:खामगाव-जालना रेल्वेमार्गामुळे‎ उजळणार जिल्ह्याचे भाग्य‎

चिखली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎बुलडाणा व जालना जिल्ह्यासाठी‎ बहुप्रतीक्षित खामगाव-जालना रेल्वे‎ ‎ मार्गासाठी राज्य‎ ‎ सरकारच्या वाट्याचा ५०‎ ‎ टक्के निधी मंजूर करत‎ ‎ असल्याची घोषणा‎ ‎ गुरुवार िद. ९ मार्च रोजी‎ ‎ उपमुख्यमंत्री तथा‎ अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‎ अर्थसंकल्पात केली. गत तीन वर्षांपासून‎ सुरू असलेल्या आमदार श्वेता महाले‎ यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे.‎ २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात‎ खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या‎ सर्वेक्षणासाठी मान्यता मिळाली होती.‎ यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद‎ करण्यात आली होती. त्यानंतर राज्य‎ सरकारने रेल्वे मार्गासाठी हिस्सा भरावा‎ यासाठी आमदार श्वेता महाले यांनी‎ विधानसभेत ४ मार्च २०२० रोजी तारांकित‎ प्रश्न उपस्थित केला होता.

रेल्वेमार्गाचे‎ सर्वेक्षण करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी‎ रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी बैठक‎ घेण्यात झाली. त्यानंतर रेल्वेमार्गाच्या‎ सर्वेक्षणासाठी तांत्रिक पथक बुलडाणा व‎ जालना येथे येऊन पाहणी करून गेले. रेल्वे‎ राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही बुलडाणा‎ जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक‎ घेऊन या रेल्वे मार्गासाठीच्या सर्व्हेक्षणास‎ मान्यता दिली होती. जालना-खामगाव या‎ नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणास‎ रेल्वे मंडळाने दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी‎ मान्यता दिली असून, फिल्ड सर्व्हेचे काम पूर्ण‎ झाले आहे. याच विषयावर त्यांनी २५ ऑगस्ट‎ २०२२ रोजी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून‎ सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. २६‎ फेब्रुवारी रोजी या रेल्वे मार्गासाठी राज्याच्या‎ अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी‎ केली होती. आमदार महाले यांनी लक्षवेधी‎ सूचना मांडून या विषयावर चर्चा घडवून‎ आणली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी‎ अर्थसंकल्पात रेल्वे मार्गासाठी तरतूद केल्याने‎ लक्षवेधीला उत्तर मिळाले आहे.‎

रेल्वे लोक आंदोलन समितीच्या‎ आंदोलनाला यश‎
रेल्वेमार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन‎ समितीच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात‎ आली होती. अर्थसंकल्पातील घोषणेमुळे‎ समितीच्या आंदोलनालाही यश आले आहे.‎ तब्बल ११५ वर्षांपासून विदर्भ आणि‎ मराठवाड्यातील नागरिक या रेल्वेमार्गाचे‎ काम व्हावे यासाठी मागणी करत आहेत.‎ दरम्यान, आता हा प्रश्न मार्गी लागणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...