आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोटरी क्लब तर्फे १८ डिसेंबर रोजी खामगाव मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावरून प्रारंभ झालेल्या स्पर्धेला विजय गणोजा, आदित्य राजपूत यांनी हिरवी झेंडी दाखवली. २१, १०, ५ व ३ कि.मी. अंतराची ही स्पर्धा होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदानावर बक्षीस वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब खामगावचे अध्यक्ष अलोक सकळकळे यांनी भूषविले होते, आमदार आकाश फुंडकर, बुलडाणा नितीन चौधरी, तहसीलदार अतुल पाटोके, विजय गणोजा, असिस्टंट मॅनेजर आदित्य राजपूत, अशोक बावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. राजीव नत्थानी, नीलेश भैय्या, नकुल अग्रवाल, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष प्रसाद मौलीक, इनरव्हील क्लब अध्यक्षा स्नेहा चाैधरी यांची विशेष उपस्थिती लाभली.
आ.आकाश फुंडकर यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करुन रोटरीच्या कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन िदले. तर तहसीलदार अतुल पाटोळे यांनी रोटरीच्या कार्याचे कौतुक केले.
रोटरीचे अध्यक्ष अलोक सकळकळे यांनी रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धाची माहिती दिली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे ३ कि.मी.महिला प्रथम गौरी वसंत राठोड, द्वितीय रुतिका संतोष नांदेवार, तृतीय सीमा अरुण वाणी, ३ कि.मी.पुरुष प्रथम राज पाटील, द्वितीय ऋणा पायघन, तृतीय मुकेश धनगर, ३ कि.मी.कपल मध्ये प्रथम प्रज्ज्वल व दिशा रंगारी, द्वितीय विक्रम व दीपाली तिवारी, ५ कि.मी.महिला प्रथम क्रमांक सलोनी लव्हाडे, द्वितीय वैष्णवी आयवार, तृतीय सिध्दी गव्हाड, ५ कि.मी.पुरुष प्रथम आकाश बोरवाल, द्वितीय आवेश चव्हाण, तृतीय सुनील बरेला, १० कि.मी.महिला प्रथम तन्वी खारने, द्वितीय प्रणाली शेगोकार, तृतीय श्वेता पवारे, १० कि.मी.पुरुष प्रथम प्रशिक थेटे, दितीय शक्ती धाकड, तृतीय अर्जुन सालवे, ४५ वर्षा आतील २१ कि.मी. प्रथम छगन बोंबले, द्वितीय दीपक शिरसाट, तृतीय प्रदीप राजपूत, ४५ वर्षाच्या वरील २१ कि.मी. प्रथम सुनील कोडम नागपूर, द्वितीय घनश्याम पद्मगीरवार नागपूर,तृतीय शंतनु गिवा नाशिक. संचालन आशिष चौधरी, करण चोपडे यांनी केले तर आभार नकुल अग्रवाल यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.