आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव:दुबार पेरणी करताना वीज कोसळून शेतकरी जागीच ठार, तर एक गंभीर जखमी; आवार येथील घटना

खामगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रामदास मांजरे हा विवाहित असून त्यास दीड वर्षाची मुलगी आहे.

शेतात दुबार पेरणी करताना अचानक वीज कोसळून आवार येथील तरुण शेतकरी जागीच ठार झाला.ही घटना आवार शिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. यातदुसरा एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील आवार येथील शेतकरी रामदास पांडुरंग मांजरे (वय 27) यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात जून महिन्यात त्यांच्या शेतात सोयाबीन पेरणी केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांचे पीक निघाले नाही. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या मांजरे यांनी शुक्रवारी दुबार पेरणी केली.

पेरणी सुरू असताना पाऊस आल्याने त्यांनी पेरणी थांबवली. दरम्यान विजेचा कडकडाट होऊन अचानक वीज रामदास पांडुरंग मांजरे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा शेतात जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला शेतकरी शुभम भिकाजीआप्पा कऊठकार (वय 23) हा गंभीर जखमी झाला. त्याला खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रामदास मांजरे हा विवाहित असून त्यास दीड वर्षाची मुलगी आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण आवार ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. रामदास मांजरे हे शेती करून गावातीलच खासगी शाळेवर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. कोरोनामुळे सद्या शाळा बंद असल्याने ते शेतात काम करत असत. खामगाव येथिल सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करूनत्यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी आवार गावचे सरपंच पती दिलीप गवई,पोलीस पाटील संदीप खराटे,शाळेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर यांच्यासह गावकऱ्यांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.या घटनेने मांजरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्या आणखी आहेत...