आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूची विक्री:खामगाव ग्रामीण पोलिसांची गावठी दारु अड्ड्यावर धाड ; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शहापूर येथील गावठी दारु अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून ८ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गावठी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शहापूर येथील तोरणा नदी पात्रालगत अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. या माहितीवरून ठाणेदार सुरेश नाईकनवरे, एपीआय द्वारकानाथ गोंदके, पीएसआय लबडे यांच्‍यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाड टाकून देवेंद्र शेषराव तलवारे याच्याकडून १६० लिटर गावठी दारु व साहित्य असा एकूण ३ हजार ९५० रुपयांचा माल तर दुसऱ्या कारवाईत बंडू श्यामराव तलवारे याच्‍याकडून गावठी दारुचे पंधरा डब्बे व साहित्य असा एकूण ४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत नापोकाँ शेख चांद, कैलास चव्हाण, भगवान काळवाघे, मुकेश इंगळे, त्रिशूल ठाकरे, विकास चव्हाण, सुनील देव, मनोज चव्‍हाण, गणेश जाधव, सुभाष रिंढे, शेख हमीद, शुद्धोधन गवारगुरू, प्रताप हिवाळे, विजेता पवार यांनी सहभाग घेतला होता. ऐन पोळ्याच्या दिवशी सकाळी ७ वाजता शहापूर शिवारात गावठी दारुचे अड्डे पोलिसांनी उद्‍ध्वस्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...