आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • Khamgaon ST. Allergy Of Bus Trips Not Leaving On Scheduled Time To Agara; For Several Months, The Burden Of The Agar Chief Post Has Been On The Shoulders Of The In charge| Mararthi News

कारभार ढेपाळला:खामगाव एस.टी. आगाराला बस फेऱ्या नियोजित वेळेवर न सोडण्याची अॅलर्जी; कित्येक महिन्यांपासून प्रभारींच्या खांद्यावर आगार प्रमुख पदाचे ओझे

गिरीश पळसोदकर | खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आगारातील बसेस नियोजित वेळेवर न सुटणे, कधी कधी नियोजित वेळेपेक्षा आधी बस निघून जाणे, बस फेरी रद्द होणे तर अनेकदा रस्त्यात बस बंद पडणे. असे अनेक प्रकार होत आहे.हा सर्व प्रकाराकडे आगार प्रमुखांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. आगाराचा ढेपाळलेला कारभारच अशा असुविधेला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. बसेस वेळेवर सुटत नसल्याने अनेक प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेवून आपला प्रवास करत आहे. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नात घट होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. तर येथील आगार प्रमुख पदाचा प्रभारच कित्येक महिन्यांपासून प्रभारीच्या भरवशावर आहे.

खामगाव आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बस फेऱ्या सोडण्यात येतात. परंतु वेळेवर बस फेऱ्या सोडण्यात येत नाही. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील अनेक गावातील विद्यार्थी हे शिक्षणासाठी खामगावला येणे-जाणे करतात. त्याचबरोबर खामगाव शहरातील बाजारपेठ मोठी असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ खरेदीसाठी येथे येत असतात. विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या बस पण वेळेवर सोडण्यात येत नाही अशी ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत संबंधितांकडे तोंडी तक्रारी केल्या. परंतु त्या परिस्थितीत बदल झालेला दिसून येत नाही. बस उशिरा सुटायच्या त्या सुटतच आहे.

त्या बस फेऱ्या अद्यापही सुरू याआधी खामगाव आगारातून खामगाव-नांदुरा- खामगाव, खामगाव-पिंपळगाव राजा-खामगाव, खामगाव-माटरगाव-खामगाव अशा शटल बस फेऱ्या सोडण्यात येत होत्या. त्या बस फेऱ्यातून आगाराला चांगले उत्पन्न मिळत होत असल्याची माहिती समजली आहे. परंतु या शटल बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्या बंद का करण्यात आल्या हे मात्र एक प्रकारे कोडेच आहे? ज्या बस फेऱ्यातून आगाराला पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही त्या फेऱ्या आजही सुरु असल्याचे समजते. पण ज्या मार्गावर अधिक उत्पन्न मिळू शकते. त्या मार्गावर खामगाव आगारातून बस फेऱ्या सोडण्यात येत नाही. मेहकर आगाराची मेहकर ते खामगाव ही बस फेरी दररोज सकाळी ९.४५ वाजता खामगाव बसस्थानकावरून सुटते.परंतु अनेकदा ही बस वेळेच्या आधीच सुटते. काही प्रवासी बस सुटण्याच्या नियोजीत ५ ते १० मिनीटे आधी येथील बसस्थानकावर आले असता आणि त्या बस बाबत चोकशी कक्षात जाऊन चौकशी करतात त्यावेळेस ती बस गेल्याचे उत्तर तेथे असलेल्या कंट्रोलर कडून मिळते. नियोजित वेळेच्या आधी ही बस कशी सोडण्यात येते त्याला जबाबदार कोण असाही प्रश्‍न प्रवासी वर्गाकडून उपस्थित केल्या जात आहे. अशाच प्रकार येथून सुटणाऱ्या बसबाबत होत आहे.

बसस्थानकातील बंद असलेले दिवे सुरू करावे
बसस्थानकाच्या परिसरातील दिवे रात्री बंद असतात. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे अप्रिय घटनेबरोबरच प्रवाशांचे पाकीट मारणे यासह अशा घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी बसस्थानक परिसरातील रात्रीच्या वेळेस दिवे सुरु ठेवावे त्याचबरोबर बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...