आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:खामगावच्या आठवडे बाजारातील दुकानाला आग; मोठे नुकसान

खामगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आठवडी बाजारातील गादी कारखान्याच्या बाजूला असलेली बँड पार्टीच्या दुकानाला ३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीमध्ये बँडचे साहित्य जळून खाक झाले असून रेडीमेड कपड्यांच्या माल जळून खाक झाला आहे. आग लागल्यामुळे दोन्ही व्यावसायिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आठवडी बाजारातील गादी कारखान्याच्या बाजूला असलेली बँड पार्टीच्या दुकान व रेडीमेड कपड्याच्या दुकानाला ३ मे रोजीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची चमू घटनास्थळी पोहोचले होते. दीपक प्रमोद महाजन यांचे रेडिमेड कपड्याचे दुकानातील माल लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. संध्याकाळच्या वेळेस दुकान बंद केल्यानंतर कृष्णा नाटेकर यांच्या दुकानांमध्ये नेऊन ठेवतात. यावेळी परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने जमा झाले होते.

बातम्या आणखी आहेत...