आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणीला सुरूवात:पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीला सुरूवात ; शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे डोळे आभाळाकडे

खामगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा तालुक्यात सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसला तरी तालुक्याच्या काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्याने तिफणीवर मूठ धरुन खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली आहे. उशिरा का होईना पेरण्या सुरू झाल्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. परंतु काही भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

यंदा मान्सून लवकरच दाखल होवून दमदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान तज्ञा कडुन व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी वखरणी करून शेती पेरणी योग्य केली होती. परंतु अर्धा जुन महिला उलटून गेला असताना अद्याप पावसाने सार्वत्रीकपणे सुरूवात करून दिली नाही. तालुक्याच्या काही भागात झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरूवात केली आहे. परंतु अद्यापही काही भागात पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास आवार परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाच्या भरवशावर या भागातील शेतकऱ्यांनी तिफणीवर मूठ धरून खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...