आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षी २१ जून पर्यत जिल्ह्यात एकूण १३४५.७ मि. मि. पावसाची नोंद करण्यात आली होती. त्याची सरासरी १०३.५ अशी आहे. तर यंदा २१ जुन पर्यत जिल्ह्यात ८१५ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ६२.७ एवढी आहे. उपरोक्त आकडेवारी पाहता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बुलडाणा जिल्ह्यात ४०.८ मि. मी. ने पावसाची तुट असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस न झाल्यामुळे सात लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. त्यातच उजाडणारा प्रत्येक दिवस कोरडा किंवा रिमझिम स्वरुपाचा जात असल्याने सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७६१.६ मि.मी. एवढे आहे. यंदा मुबलक व वेळेच्या आत मान्सूनला सुरूवात होईल, असा अंदाज विविध हवामान तज्ञांनी व्यक्त केला होता. लवकरच पावसाला सुरूवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी वखरणी करून शेती पेरणीसाठी तयार केली आहे. परंतु अर्धा जून महिना उलटून गेला असतांना देखील जिल्ह्यात पावसाने सार्वत्रीक स्वरुपात सुरूवात करून दिली नाही. त्यामुळे सात लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत.
पावसाअभावी ग्रामीण भागात रोजगार नसल्यामुळे मजूर वर्ग ठाण मांडून घरी बसला आहे. दमदार व सार्वत्रीक पाऊस कधी पडतो, याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. वास्तविक पाहता मागील वर्षी २१ जून पर्यंत जिल्ह्यात एकुण १३४५.७ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. त्याची सरासरी १०३.५ अशी आहे. तर यंदा २१ जून पर्यंत जिल्ह्यात ८१५ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ६२.७ एवढी आहे. उपरोक्त आकडेवारी पाहता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बुलडाणा जिल्ह्यात ४०.८ मि. मी. ने पावसाची तूट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे डोळे पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊस
जिल्ह्यात २१ जूनपर्यंत ८१५.० मि. मी. पावसाची नोंद केली.त्याची सरासरी ६२.७ एवढी आहे. त्यात सर्वाधिक मेहकर १२३.५ पाऊस झाला आहे. तर त्या खालोखाल चिखली १०३. १ मि.मी, बुलडाणा ७०, देऊळगावराजा ७६.३, सिंदखेडराजा ८८.२, लोणार ७७, खामगाव ५९.९, शेगाव ५८.४, मलकापूर ३१.८, नांदुरा ३०.६, मोताळा ३६.८, संग्रामपूर ३४.७ व जळगाव जामोद तालुक्यात नाममात्र २४.७ पावसाची नोंद केली.
चिखली मेहकर तालुक्यावर वरुण राजाची कृपादृष्टी
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी वरुण राजाने चिखली व मेहकर तालुक्यावर कृपा दृष्टी टाकली आहे. या दोन्ही तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदात आहे. आतापर्यंत या दोन्ही तालुक्यात १०० मि. मि. हुन अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत खरिपाच्या पेरण्यांना सुरूवात झाली आहे.
मागील वर्षी २१ जूनपर्यंत जिल्ह्यात झालेला सरासरी पाऊस
मागील वर्षी जिल्ह्यात २१ जून पर्यंत १३४५. ७ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. त्याची सरासरी १०३.५ एवढी आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुका ७८.४ मि.मी., चिखली १७८.७ मि.मी, देऊळगावराजा ६७.४, सिंदखेड राजा १४७.५, लोणार १५५.२, मेहकर २२५.१, खामगाव १५४.९, शेगाव ३५.२, मलकापूर ४७.६, नांदुरा ७१.१, मोताळा ६०.५, संग्रामपूर ९२.९ व जळगाव जामोद तालुक्यात २२.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.